कुंडलिनी शक्तीचे रहस्य उलगडले. भरपूर चित्रं, 287 पानांचा चिंतनात्मक ग्रंथ. Kundalini Powers.
₹593.00
✓ In Stock
पुस्तकाचे वर्णन
सावधान, हे पुस्तक सामान्य वाचकांसाठी नाही!
'कुंडलिनी शक्तीचे रहस्य उलगडले.' भरपूर चित्रं, 287 पानांचा चिंतनात्मक ग्रंथ.
आध्यात्मिक प्रगतीसाठी हा ग्रथ तुमच्या संग्रही हवाच!
वेद, उपनिषद, गीता, पुराण शास्त्र, प्राचीन भारतीय संस्कृतिच्या अभ्यासका कडून कुंडलिनी जागृती बाबतचे अप्रतीम भाष्य. प्रत्येक रेकी हीलरला समृद्ध बनवणारा ग्रंथ. चक्र हीलिंगचे अप्रतीम मार्गदर्शन तपशीलवार चर्चा.
या ग्रंथातील एक एक ओळ तुम्हाला चिंतन करावयास भाग पाडते, ज्यामुळे तुम्ही आत्मचिंतनात खोलवर जाता.
अनेक धार्मिक गुरू, पंथ, सम्प्रदाय यांनी केवळ नावाजले असे नव्हे तर या ग्रंथाची अनेक पारायणे केली, ज्यातून नवे नवे अन्वयार्थ अन ब्रम्हांडीय रहस्ये उलगडत गेली आहेत.
ग्रंथ-विवरण:
भारतीय अध्यात्मिक परंपरेत कुंडलिनी शक्ती ही एक अत्यंत महत्त्वाची आणि शक्तिशाली संकल्पना आहे. ही 'दैवी ऊर्जा' मानवी शरीरात, पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्राजवळ साडेतीन वेटोळी घालून सुप्त अवस्थेत असते असे मानले जाते. या शक्तीची जागृती झाल्यावर साधकाला आत्मिक मुक्ती, आत्मज्ञान आणि अनेक सिद्धी प्राप्त होतात, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे.
परंतु, याच गूढ आणि अद्भुत विषयाभोवती आज अनेक गैरसमज आणि अपूर्ण माहितीचे जाळे विणले गेले आहे. मराठी भाषेत या विषयावर सखोल, अनुभवावर आधारित आणि व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या मार्गदर्शनाचा अभाव आहे, हे खेदाने म्हणावे लागते. बाजारात उपलब्ध असलेली बरीच पुस्तके वाचल्यावर लक्षात येते की, अनेक लेखकांनी स्वतः कोणताही अनुभव न घेता, केवळ इतर पुस्तकांमधील माहितीची पुनरावृत्ती केली आहे.
आमचे हे पुस्तक याच गैरसमजांना दूर करून साधकांना कुंडलिनी विषयावर अचूक ज्ञान देण्यासाठी लिहिले आहे. आम्ही अनेक साधकांना त्यांच्या कुंडलिनी जागृतीच्या प्रवासात मदत केली आहे आणि या पुस्तकाच्या शेवटी आम्ही आमचा स्वतःचा अनुभव देखील प्रामाणिकपणे नमूद केला आहे, जो साधकांना योग्य दिशा देईल.
कुंडलिनी जागृतीत गुरु आणि साधकाची भूमिका;
कुंडलिनी शक्तीच्या संदर्भात सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज म्हणजे, 'गुरु तुमची कुंडलिनी जागृत करू शकतो...' कोणीही कुणाचीही कुंडलिनी शक्ती जागृत करून देऊ शकत नाही. हे एक महत्त्वपूर्ण सत्य आहे, जे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवले पाहिजे.
कुंडलिनी शक्ती ही एक अंतर्गत ऊर्जा आहे. ती व्यक्तीच्या आत, तिच्या अस्तित्वाच्या मुळाशी सुप्त आहे. तिची जागृती होण्यासाठी साधकाची स्वतःची तीव्र इच्छाशक्ती, कठोर साधना आणि आंतरिक तयारी आवश्यक असते. बाह्य उपाय किंवा केवळ दुसऱ्याने दिलेली दीक्षा साधकाच्या स्वतःच्या प्रयत्नांशिवाय कार्य करू शकत नाही.
गुरुची भूमिका काय आहे? गुरु हा केवळ मार्गदर्शक असतो. साधकाला खांद्यावर घेऊन जाणारा खांदेकरी नव्हे, की साधना न करता आयते फळ मिळेल.
गुरुचे कार्य: जेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नाने, योगाभ्यास, प्राणायाम, ध्यान किंवा नामजपाने कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गुरु त्याला योग्य मार्गदर्शन करतो.
धोक्यांपासून बचाव: जागृतीच्या वेळी साधकाला येणारे अनुभव, शारीरिक आणि मानसिक बदल अत्यंत तीव्र असू शकतात. अशा वेळी गुरु साधकाला सुरक्षितपणे त्या प्रक्रियेतून जाण्यासाठी मदत करतो.
थोडक्यात, गुरु तुम्हाला सायकल चालवायला शिकवतो, पण सायकल चालवायची क्रिया तुम्हाला स्वतःच करावी लागते. गुरु तुम्हाला कुंडलिनी जागृत करण्याची योग्य पद्धत आणि साधनेचे टप्पे सांगतो, पण ती साधना तुम्हाला स्वतःच करावी लागते. साधकाचा स्वतःचा संकल्प आणि प्रयत्न हेच कुंडलिनी जागृतीचे मूळ रहस्य आहे.
कुंडलिनी शक्तीबद्दल अनेक वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी (गैर) समजुती प्रचलित आहेत. या परिस्थितीची तुलना पंचतंत्रातील पाच अंध पुरुषांच्या कथेशी करता येईल, जिथे प्रत्येक अंध व्यक्तीने हत्तीच्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श केला आणि त्यानुसार हत्तीचे वर्णन केले. ज्याने सोंडेला स्पर्श केला त्याला वाटले हत्ती सापासारखा आहे, तर ज्याने पायाला स्पर्श केला त्याला वाटले तो खांबासारखा आहे.
त्याचप्रमाणे, कुंडलिनीचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण म्हणून त्या ऊर्जेचे मूळ स्वरूप बदलत नाही. काही प्रमुख गैरसमज खालीलप्रमाणे आहेत:
गैरसमज: कुंडलिनी जागृती म्हणजे फक्त शारीरिक क्रिया किंवा योगासने.
सत्य: योगासने आणि प्राणायाम शरीराला शुद्ध आणि या ऊर्जेसाठी तयार करतात, पण कुंडलिनी जागृती ही मुख्यत्वे प्राणिक आणि मानसिक प्रक्रिया आहे, ज्यात ध्यान, मंत्र जप आणि आंतरिक शुद्धी महत्त्वाची आहे.
गैरसमज: कुंडलिनी जागृत झाल्यावर लगेच सिद्धी प्राप्त होतात किंवा व्यक्ती देवस्वरूप बनतो.
सत्य: कुंडलिनी जागृती ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. जागृतीनंतर साधकाची ऊर्जा वाढते आणि उच्च आध्यात्मिक अनुभवांचे दरवाजे उघडतात, पण ती ऊर्जा सांभाळणे, तिला नियंत्रित करणे आणि आत्म-विकासासाठी वापरणे हे सर्वात महत्त्वाचे असते. साधकाने सिद्धींच्या मोहात न अडकता मोक्षाकडे वाटचाल करणे अपेक्षित आहे.
गैरसमज: ही शक्ती केवळ काही विशिष्ट लोकांनीच जागृत करावी.
सत्य: ही ऊर्जा प्रत्येक मानवी शरीरात सुप्त आहे. योग्य मार्गदर्शन आणि तयारीने कोणताही साधक याची अनुभूती घेऊ शकतो, पण त्यासाठी नैतिक आचरण (यम-नियम), शारीरिक शुद्धी आणि मानसिक एकाग्रता आवश्यक आहे. अपूर्ण ज्ञानामुळे साधकाला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना करणे अनिवार्य आहे.
साधकांसाठी महत्त्वपूर्ण संदेश
हे पुस्तक केवळ साधकांसाठी आहे, जे प्रामाणिकपणे आत्म-विकासाच्या मार्गावर आहेत आणि कुंडलिनी जागृतीसाठी स्वतः प्रयत्न करण्यास तयार आहेत.
हे पुस्तक स्वयंघोषित गुरूंसाठी नाही!
कुंडलिनी जागृती म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणे. ही शक्ती सहस्रार चक्रात शिवाला भेटते, तेव्हा साधकाला समाधीचा आणि परमानंदाचा अनुभव येतो. या प्रवासात, साधकाचे मन शांत होते, त्याचे शरीर निरोगी बनते आणि तो आपल्या अस्तित्वाच्या अंतिम सत्याच्या जवळ जातो.
आमच्यासोबत या गहन, अद्भुत आणि स्व-प्रयत्नाच्या मार्गावर चालण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही साधकाचे आम्ही स्वागत करतो. तुम्ही स्वतः प्रयोग करा, अनुभव घ्या आणि मग सत्याची पराकाष्ठा अनुभवा.
कुंडलिनी तुमच्या आतच आहे, फक्त तुम्हाला तिला ओळखायचे आहे.
या ग्रंथात आपणास काय मिळेल:
आपण या ग्रंथात कुंडलिनीचे तात्विक अधिष्ठान समजून घ्याल ती केवळ मूलाधार शक्ती नसून, सूर्याच्या पुरुष तत्त्वातून आणि पृथ्वीच्या स्त्री तत्वातून निर्माण झालेली ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. समुद्रमंथनाच्या पौराणिक रूपकाद्वारे देव आणि दानवांच्या शक्तीचा समन्वय साधून, कुंडलिनीला जागृत करण्याचा क्रियायोग शिकाल.
ग्रंथ निष्क्रिय ब्रह्माचे स्वरूप, शिव-शक्तीचा संगम आणि जीवन कणांचे आगमन यांसारख्या विषयांवर सखोल चिंतन करतो. तसेच, अखंड जाणीव (साक्षीभाव) कशी प्राप्त करावी, स्वप्न आणि जागृत अवस्थेतील ऐक्य कसे साधावे, आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी कर्म-अणूंचे विसर्जन (निर्जरा) कसे करावे, याचे तात्विक मार्गदर्शन मिळेल.
ग्रंथातील काही प्रमुख तात्विक विषय:
· स्फूर्ती आणि संकटे: कुंडलिनी जागृतीच्या मार्गावर येणारे अहंकाराचे अडथळे, वासनेची दलदल आणि क्रोधामुळे होणारे ऊर्जेचे पतन (उदा. राजा विश्वामित्र). अशा संकटांवर मात करण्यासाठी गुरुतत्त्व आणि देवाला पूर्ण शरण जाणे याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
· जागृतीची प्रक्रिया: आज्ञा चक्रावर ध्यान केंद्रित करून ऊर्जेला सहस्रार आणि मूलाधारातून वर-खाली प्रवाहित करण्याची शास्त्रीय पद्धत अत्यंत सोप्या भाषेत वर्णन केली आहे.
· अंतिम अनुभूती: ब्रह्मानंदाची अवस्था, पूर्ण अंतर्मुखता आणि सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती, ज्यामुळे साधक शक्ती आणि सिद्धींचा अनंत भांडार बनतो.
हा ग्रंथ केवळ वाचनीय नाही, तर तो आत्मिक मंथनाची (आंतरिक संघर्षाची) आणि नित्य जाणीवेची (शाश्वत ज्ञानाची) गुरुकिल्ली आहे. योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास साधकाला अज्ञानाच्या अंधारातून आत्मिक सत्याच्या प्रकाशाकडे घेऊन जातो.
आताच हा ग्रंथ वाचा आणि आपल्या जीवनाचा या पृथ्वीवर जन्म घेण्याचा अंतिम हेतू (मोक्ष) साध्य करा!
एक नजर अनुक्रमणिकेवर
1. अध्याय 1
2. कुंडलिनी शक्ती म्हणजे काय?
3. चक्र म्हणजे काय?
4. 'चक्रे' नेमकी कुठे असतात?
5. 'कुंडलिनी जागृत करण्याची आवश्यकता का आहे?'
6. जेंव्हा चक्र सक्रिय होतात तेंव्हा नेमके काय होते?
7. चक्र बॅलंस कशी केली जातात?
8. चक्र आणि आपल्या शरीरातील ग्रंथी यांचा काय संबंध आहे?
9. चक्र सक्रिय करण्याची प्रक्रिया अर्थात कुंडलिनी जागृत करण्याची पद्धति
10. अध्याय 2
11. चक्रांचे रंग कोणते असतात? मला कोणतेच रंग दिसले माहीत, माझ्या बाबतीत काही विपरीत घडत आहे का?
12. चक्रांचे रंग आणि वैश्विक तत्त्वज्ञान:
13. बीजाक्षर (किंवा मंत्र) काय असते?विस्तारपूर्वक सांगा.
14. अध्याय 3
15. कुण्डलिनी जागृत करण्याची वेळ आली आहे, हे कसे समजावे?
16. कुंडलिनी जागृत हो रही है तब क्या ना करे?
17. साधना के दरमियान ये नहीं करे
18. अध्याय 4
19. भ्रमाची अवस्था आणि कुंडलिनी शक्ति
20. कुंडलिनी जागृत होत असेल तेंव्हा काय करू नये?
21. साधना करताना काय करू नये.
22. कुंडलिनी, प्राण ऊर्जा आणि ब्रह्मांडीय ऊर्जा: चेतनेच्या त्रयीचा महायोग
23. अध्याय 5
24. चक्रांचे विवरण
25. ‘मूलाधार’ चक्र:
26. ‘स्वाधिष्ठान’ चक्र
27. ‘मणीपूर’, चक्र
28. ‘अनाहत’, चक्र
29. ‘विशुद्ध’ चक्र
30. आज्ञा चक्र
31. सहस्त्रार चक्र
32. कुण्डलिनी शक्ति ला ‘सर्पेनटाईन’ पावर का म्हणतात?
33. कुण्डलिनी शक्ति चे चिन्ह
34. अध्याय 6
35. कुण्डलिनी जागृत झाल्यावर आपल्याला कोणकोणत्या गति प्राप्त होतात?
36. पिपिलिका गती:
37. भुजंग गती:
38. मंडूक गती:
39. विहंग गती:
40. काही रूढीवादी लोकांना स्पर्श साधना पद्धतीवर आक्षेप का आहे?
41. प्रत्येक ‘पारलौकिक रेकी हीलर’ची कुण्डलिनी शक्ति जागृत असते का?
42. ब्रम्हांडात कुण्डलिनी शक्तिचे स्थान:
43. अध्याय 7
44. कुण्डलिनी जागृत करण्याची आध्यात्मिक पद्धत
45. ‘हठ योगा’ द्वारा कुण्डलिनी जागरण ‘भक्ति मार्ग’ द्वारा कुण्डलिनी जागरण
46. ‘उपवास’ द्वारा कुण्डलिनी जागरण
47. कुंडलिनी चा माझा अद्भुत अनुभव

Weight: 0.25 kg
Country of Origin: India