दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी (मराठी) अफलातून भरपूर चित्रांसह, 295 पानांची सम्पूर्ण कथा, Sindbad - Emporium
← Back to All Products

दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी (मराठी) अफलातून भरपूर चित्रांसह, 295 पानांची सम्पूर्ण कथा, Sindbad

Barcode (ISBN): 978-81-688562-9-5
₹478.00
✓ In Stock

पुस्तकाचे वर्णन

आज जेव्हा मी हे पुस्तक आपल्या हाती सुपूर्द करत आहे, तेव्हा माझ्या मनात साठवलेल्या अनेक जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. आपल्या सर्वांच्याच बालपणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्या रात्रीच्या वेळी ऐकलेल्या गोष्टी. उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही आजोळी जात असू.

तेव्हा पंखे वैगेरे नसत, आणि घरं लहान असत, मग सगळ्या बाळ गोपाळांची झोपण्याची सोय बाहेर चांदण्याखाली अंगणात होत असे. सर्व अंगणे चोपून सारवलेले असत. टीवी नसायचा तेव्हा. मग जेवणं व्हायची साडे सात आठला. पुढे आजोबांच्या  गोष्टी रंगायच्या. आजीचे जेवण उरकले की ती आजोबांना पान आणून देई. पानाचा तोबरा जसा रंगत जाई तस तशी कथा रंगत असी. या कथा आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जायच्या. त्या जादुई जगाचा नायक असायचा, दर्यावर्दी सिंदबाद!

आजच्या या धावपळीच्या आणि यंत्रांच्या जगात आपण कुठेतरी हरवून गेलो आहोत. मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी आता काचेचे ‘स्क्रीन’ आले आहेत आणि त्या पडद्यांच्या आभासी जगात साहसाची खरी व्याख्या कुठेतरी पुसट होत चालली आहे. म्हणूनच, मला असे वाटले की आपल्या संस्कृतीचा आणि जागतिक साहित्याचा हा अमूल्य ठेवा पुन्हा एकदा जिवंत करण्याची वेळ आली आहे. दर्यावर्दी सिंदबादच्या या सात सफरी म्हणजे केवळ एका खलाशाचा प्रवास नाही, तर ते मानवी जिद्दीचे, अपार धैर्याचे आणि बुद्धिमत्तेचे एक अजरामर महाकाव्य आहे.

जेव्हा आपण या पुस्तकाची पाने उलटायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे केवळ लहानांसाठीचे हे मनोरंजनाचे साधन नाही. मोठे लोकही जेव्हा या कथा वाचतात, तेव्हा त्यांना त्यातील जीवनाचे मर्म उमजते.

संकटे कितीही मोठी असली, तरी माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि नशिबाच्या साथीने त्यावर कशी मात करू शकतो, याचा हा वस्तुनिष्ठ वस्तुपाठ आहे. सिंदबादच्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका आशेने होते, मधला काळ हा अकल्पनीय संघर्षाचा असतो आणि शेवट हा एका महान समाधानाचा असतो. हीच तर आपल्या आयुष्याची सुद्धा खरी रीत आहे.

पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे आपल्या मुलांशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा एक दुवा आहे. रात्रीच्या शांत वेळी, जेव्हा घर निवांत असते, तेव्हा आपल्या मुलाला कुशीत घेऊन सिंदबादची एखादी सफर सांगणे, यात जो आनंद आहे तो कोणत्याही यंत्राच्या खेळण्यात नाही. यामुळे मुलांची कल्पनाशक्ती विस्तारते. जेव्हा सिंदबाद एखाद्या अक्राळविक्राळ पक्ष्याच्या पायाला स्वतःला बांधून घेतो किंवा एखाद्या हत्तीच्या पाठीवर बसून अरण्य पार करतो, तेव्हा त्या मुलाच्या मनात जे चित्र उभे राहते, ते चित्र त्याच्या बुद्धीला धार लावणारे असते.

या पुस्तकाची मांडणी करताना आम्ही असा प्रयत्न केला आहे की, त्यातील प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचताना वाचकाला आपण स्वतः सिंदबादच्या जहाजावर आहोत असे वाटावे. त्या अथांग समुद्राच्या लाटा, अज्ञात बेटांवरील ती गूढ अरण्यांची शांतता आणि प्रत्येक वळणावर दबा धरून बसलेले मृत्यूचे संकट, हे सर्व काही अतिशय ओघवत्या भाषेत मांडले आहे.

यातील चित्रमय मांडणी केवळ डोळ्यांना सुखावणारी नाही, तर ती कथेला जिवंत करणारी आहे. चित्रे पाहताना मुले त्या कथेशी अधिक घट्टपणे जोडली जातात आणि त्यांना वाचनाची एक वेगळीच गोडी लागते.

संस्कारांची शिदोरी ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

मुलांना 'धैर्य' म्हणजे काय, हे सांगण्यापेक्षा सिंदबादच्या संकटातील कृतीतून ते जास्त प्रभावीपणे समजते.

सातव्या सफरीत सिंदबादने मिळवलेली ती शाश्वत शांती आपल्याला शिकवते की, आयुष्यात पैसा आणि हिरे-माणके यांपेक्षाही मौल्यवान काही असेल, तर ते म्हणजे आपले स्वातंत्र्य आणि आपल्या मनाची शांतता. हे संस्कार मुलांच्या मनावर कळत-नकळतपणे ठसत जातात आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ देतात.

हे पुस्तक केवळ एका कपाटाची शोभा वाढवण्यासाठी नाही, तर ते घराघरातल्या प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून वाचण्यासाठी आहे. आजी-आजोबांना या कथा वाचताना स्वतःचे बालपण आठवेल आणि कदाचित ते आपल्या नातवंडांना या कथेशी जोडलेले स्वतःचे काही अनुभवही सांगतील.

अशा प्रकारे हा एक कौटुंबिक मनोरंजनाचा आणि प्रेमाचा ठेवा ठरेल. धकाधकीच्या जीवनात कुटुंबाने एकत्र येण्याचे निमित्त कमी होत चालले असताना, हे पुस्तक सर्वांना एका जादुई प्रवासाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम करेल.

शेवटी, ही केवळ एक काल्पनिक कथा नाही, तर ती मानवी अस्तित्वाची एक प्रेरणादायी गाथा आहे. सिंदबाद हा आपल्यातलाच एक माणूस आहे, जो पडतो, जो थबकतो, जो घाबरतो, पण जो कधीच हार मानत नाही. 

दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी

सातासमुद्रापारच्या अद्भुत साहसविश्वात घेऊन जाणारे पुस्तक!

लहानपणापासून आपल्या मनाला भुरळ घालणाऱ्या साहसी आणि जादुई कथांमध्ये सिंदबादच्या सफरी हा एक वेगळाच खजिना आहे.

“दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी” हे पुस्तक वाचकांना कल्पनारम्य, रहस्यमय आणि थरारक जगात घेऊन जाते. प्रत्येक सफर म्हणजे नव्या संकटांचा सामना, बुद्धीचातुर्याने मिळवलेला विजय आणि जीवनाला प्रेरणा देणारा अनुभव. 

समुद्रातील अनोळखी बेटे, राक्षसी पक्षी, खजिन्यांनी भरलेली गुहा, आणि संकटातून मार्ग काढणारा धाडसी सिंदबाद — या सर्व गोष्टींमुळे हे पुस्तक एक रोमहर्षक वाचन अनुभव देणारे ठरते.

विशेष सूचना: सदर पुस्तक हे उत्कृष्ट अमेरिकन इंग्रजीतही याच वेबसाईटवर उपलब्ध आहे. नवीन पीढीच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना भेट देण्यास अगदी योग्य! 

या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये

सर्व वयोगटांसाठी आकर्षक

या कथा फक्त मुलांसाठी नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खिळवून ठेवणारे हे साहसी जग आहे.

बालपणीच्या आठवणींना उजाळा

आजोबा-आजींना त्यांच्या बालपणातील कथा पुन्हा अनुभवता येतील, तर पालकांना मुलांसोबत आनंदाने वाचन करण्याची सुंदर संधी मिळेल.

धैर्य आणि जिद्दीचे संस्कार

प्रत्येक सफरीतून संकटावर मात करण्याची प्रेरणा, धाडस आणि बुद्धिमत्तेची ताकद मुलांच्या मनात रुजते.

आकर्षक चित्रमय मांडणी

सुंदर आणि जिवंत चित्रांमुळे कथा डोळ्यासमोर उभ्या राहतात. मुलांची कल्पनाशक्ती आणि वाचनाची आवड वाढवणारी मांडणी. 

मोबाईलला उत्तम पर्याय

सुट्टीच्या दिवसात मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचनाच्या सुंदर सवयीची सुरुवात करण्यासाठी हे पुस्तक उत्तम साथीदार ठरेल.

झोपताना सांगण्यासाठी परफेक्ट गोष्टी

प्रत्येक कथा इतकी रंजक आहे की ती बेडटाइम स्टोरी म्हणून मुलांना ऐकवण्यासाठी अगदी योग्य आहे.

संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा खजिना

आजच्या वेगवान जीवनात कुटुंबासोबत बसून गोष्टी ऐकणे-वाचणे हा एक वेगळाच आनंद आहे.

“दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी” हे पुस्तक मुलांच्या मनात साहसाची ठिणगी पेटवते आणि कुटुंबाला एकत्र आणणारा सुंदर अनुभव देते.

सिंदबादच्या अचाट साहसांचे साक्षीदार व्हा आणि कल्पनाशक्तीच्या सातासमुद्रापारच्या प्रवासाला निघा!

प्रत्येक घरात असायलाच हवे असे पुस्तक

हे केवळ गोष्टींचे पुस्तक नाही —

ते आहे साहस, प्रेरणा आणि कुटुंबीयांसोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचा खजिना.

आजच आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हे अप्रतिम पुस्तक खरेदी करा!

सिंदबादच्या सात अद्भुत सफरी तुमची वाट पाहत आहेत
Weight: 0.25 kg
Country of Origin: India
₹478.00