कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन,वेबसाईट कंटेंट,पाठ्यपुस्तक Write the best - Emporium
← Back to All Products

कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन,वेबसाईट कंटेंट,पाठ्यपुस्तक Write the best

₹650.00 ₹590.00
✓ In Stock

पुस्तकाचे वर्णन

लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!

अनेक दिग्गज मराठी साहित्यिकांची थोर परम्परा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. या लेखक लोकांनी मराठी संस्कृति समृद्ध बनवली खरी परन्तु स्वत:चे सवते सुभे साम्भाळूनच! मुद्दामहूनच जन सामान्याना ‘लेखक कसे बनावे’ याचे रहस्य सांगीतले गेले नाही. सबब बहुजन लोकं विचारवंत असूनही ना इतीहासात आपले नाव अंकित करू शकले, ना आपल्या विचारांतून येणा-या पिढ्यांसाठी काही धडे देऊ शकले. जनसामान्याना आजही लेखक बनणे म्हणजे दैवी चमत्कारच वाटतो.

मात्र ‘लेखक कसे बनावे’ याचे ज्ञान मुक्तपणे डॉ. जोशी यांनी पहिल्यांदाच मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. अन त्याला प्रचंड प्रतिसाद (विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातून) येत आहे. आता लेखक बनण्याचे तुमचे स्वप्न आकाराला येईलच.

तुम्हाला केवळ लेखक बनवण्याचे सूत्र डॉ. जोशी सांगत नाहीत, तर तुम्हाला ते "लेखक उद्योजक" (व्यावसायीक लेखक) बनण्याची युक्ति सांगतात. कारण ते स्वत: एक यशस्वी मराठी व्यावसायीक लेखक आहेत. होतकरू लेखकांचे आर्थिक सबलीकरण हा त्यांच्या लेखनाचा मूळ हेतू आहे.

कादम्बरी, नाटक, चित्रपट- टीवी मालिका- पटकथा इ. कसे लिहावे याचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता ते ऑनलाईन मार्केट मध्ये कसे विकावे, चित्रपट पटकथा विकतानाचे निकष अन अडचणी इत्यादीची दीर्घ चर्चा या पुस्तकात आहे.

सदर पुस्तक पाठ्यपुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून (इंग्रजी आवृत्ती) VNSGU येथे विद्यापिठात मान्यताप्राप्त आहे.

डॉ. जोशी यांनी आजपर्यंत विविध विषयांवर 348 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी 10 एपिसोड वेब-सिरीज स्क्रिप्ट लिहिले आहे. ते अनेक सेलिब्रिटींसाठी घोस्ट रायटर आहेत. हे पुस्तक त्यांच्या अनुभवाचे सार आहे. जास्त विचार न करता आत्ताच निर्णय घ्या, हे अप्रतिम पुस्तक खरेदी करा.

गेली 35 वर्ष सातत्याने विपुल लिखाण केलेल्या डॉ. जोशी यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. तुम्हीही जगप्रसिद्ध लेखक व्हा.

या पुस्तकात तुम्ही शिकाल:

✔ प्रभावी कथा व कादंबरी लेखन

✔ पात्रनिर्मिती व कथानक विकास

✔ चित्रपट व वेब सिरीज पटकथा लेखन

✔ संवाद लेखन

✔ पाठ्यपुस्तक लेखन

✔ वेबसाईट कंटेंट लेखन

✔ घोस्ट रायटिंग

✔ अॅमेझॉन किंडल व सेल्फ पब्लिशिंग

✔ पुस्तकांचे मार्केटिंग व विक्री

✔ लेखक म्हणून उत्पन्नाचे विविध मार्ग

हे पुस्तक केवळ लेखन शिकवत नाही.

हे पुस्तक तुम्हाला "लेखक उद्योजक" बनवते. लेखनापासून प्रकाशनापर्यंत आणि प्रकाशनापासून विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास या पुस्तकात समाविष्ट आहे. जर तुम्ही लेखक होण्याबाबत गंभीर असाल, तर हे पुस्तक तुमच्या संग्रहात असायलाच हवे.

आजच तुमची प्रत मागवा आणि तुमच्या लेखन प्रवासाची सुरुवात करा.

उदाहरण म्हणून काही उतारे बाहेरील चित्रात दिले आहेत, ते जरूर वाचावेत, जेणें करून पुस्तकाचा व्यापक आराखडा तुमच्या ध्यानात येईल.

हे पुस्तक तुमच्यातील लेखकास परीपूर्ण बनवते, तुम्हाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

हे पुस्तक, तुम्हाला टायपिंग सेटिंगचे ही तांत्रिक ज्ञान देते. जे विशेषत: ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लेखकां साठी वा ज्यांना कम्प्युटरचा ‘क’ ही कळत नाही अशा लेखकां साठी आहे.

हे पुस्तक केवळ लिखाणाबद्दलच नाही तर पुस्तकाच्या विक्रीबद्दल देखील आहे. आवश्यक ठिकाणी लेखकाने लेखनाची व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत. वैयक्तिक अनुभवावर आधारीत या पुस्तका मुळे तुम्ही एक व्यावसायीक लेखक म्हणून निश्चितच ख्याती प्राप्त व्हाल!

हे पुस्तक समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर थेट प्रहार करते.

अनेक गुरु 'लेखक कसे व्हावे' हे ऑनलाइन शिकवत आहेत किंवा प्रचंड फीस घेऊन वर्ग चालवत आहेत. ते तथाकथित गुरु तुम्हाला चांगले पुस्तक लिहिण्यासाठी नाही तर सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक लिहिण्यासाठी सांगतात.

त्यांनी 'रिच डॅड पुअर डॅड' मधील हे वाक्य उचललेलं आहे. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतातील एमएलएम व्यवसायांमुळे 'रिच डॅड पुअर डॅड' लोकप्रिय झाले. त्या पुस्तकाच्या अनुषंगाने या वाक्याचे वेगळे संदर्भ आहेत. कारण ते पुस्तक लोकप्रिय नसून ‘एम. एल. एम. सिस्टम’ द्वारे लोकांच्या माथी मारले गेले होते.

कृपया एक सोपे सूत्र लक्षात ठेवा... एक चांगले पुस्तक लिहा. परिणामी, ते सर्वोत्तम विक्री होणारे पुस्तक होईल.

तुम्हीच सांगा, जर एखादे पुस्तक वाईट पद्धतीने लिहिलेले असेल तर ते सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक कसे बनू शकते?

या अनुसार समजा, नवीन लेखक काहीही सपक लिहून अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर पुस्तके विक्रीस ठेवतील. वाचक ते पुस्तक खरेदी करतील. पण लक्षात ठेवा यातील मेख अशी आहे की या वेबसाइटसची एक नीती आहे, की खरेदीदार दहा दिवसांत पुस्तक परत करू शकतात.

जर पुस्तक चांगले नसेल तर वाचक ते परत करतील. ई-पुस्तकांबद्दलही हेच सत्य आहे. मग लोकांना पैसे परत करावे लागतात. गुगल बुक्स आणि किंडल बुक्समध्येही परतीची (रिटर्नची) सुविधा असते. म्हणून तुमच्या वाचकांना दर्जाहीन साहित्यकृती देण्याचा प्रयत्न करू नका. आजचा वाचक (ग्राहक म्हणून) सुजाण आहे. लेखका पेक्षा हुशार आहे.

लेखक म्हणून, प्रामाणिक रहा. चांगलं लिहा, चांगलं विका. पैशा बरोबर प्रसिद्धी अन समाधान मिळवा.
Weight: 0.25 kg
Country of Origin: India
₹590.00 ₹650.00