सोपे टॅरो कार्ड रीडिंग, टॅरो कार्डस अन ज्योतिषशास्त्र यांचा परस्परान्वयक अभ्यास, द्वैत आणि अद्वैत यांची कार्ड्स संदर्भात गहन चर्चा New Tarot Card Reading 421 pages Book - Emporium
← Back to All Products

सोपे टॅरो कार्ड रीडिंग, टॅरो कार्डस अन ज्योतिषशास्त्र यांचा परस्परान्वयक अभ्यास, द्वैत आणि अद्वैत यांची कार्ड्स संदर्भात गहन चर्चा New Tarot Card Reading 421 pages Book

₹678.00
✓ In Stock

पुस्तकाचे वर्णन

“आरंभ: वैश्विक ऊर्जेचा संवाद”  

अर्थात, 'सोपे टॅरो कार्ड रीडिंग!' नवशिक्या पासून ते एक्स्पर्ट लेवल पर्यंत सर्वांनाच मार्गदर्शन देणारे अफलातून पुस्तक.  

टॅरो कार्डस अन ज्योतिषशास्त्र यांचा परस्परान्वयक अभ्यास

द्वैत आणि अद्वैत यांची कार्ड्स संदर्भात गहन चर्चा

नवीन सुधारीत आवृत्ती: मोठा फोन्ट, मोठी चित्रं.   

आत्तापर्यंत टॅरो कार्ड्स रीडिंग संदर्भात योग्य पुस्तक मराठीत नव्हते. टॅरो कार्डस अन ज्योतिषशास्त्र यांचा सुरेख संगम या अभ्यासपूर्ण पुस्तकात असून, ग्रहांचे साहाय्य तसेच द्वैत आणि अद्वैत दृष्टी यांची थोडक्यात चर्चा आहे. चित्रांचे वर्णन आणि प्रतीकांचा अर्थ यात समर्पक पणे डॉ. जोशी यांनी दिलेला आहे.  

द्वैत अन अद्वैत याची सांगड घालणारे आगळेवेगळे मार्गदर्शन तुमच्या भविष्य वाणीला आध्यात्मिक तेज देते. अन तुम्ही सामान्य रीडर न रहाता ब्रम्हांडीय रहस्य उलगडायला निघालेले एक सामर्थ्यशाली गुरू बनता. ज्याचे ‘इंट्यूईशन्स’ अत्यंत प्रखर बनतात.

डॉ. जोशी हे वेद, उपनिषद, गीता, पुराण शास्त्र अन प्राचीन भारतीय संस्कृती याचे गाढे अभ्यासक आहेत. लेखणीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व असून, आतापर्यंत विविध विषयांवरील तब्बल ३३९ ग्रंथ त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारले गेले आहेत. (त्यांनी अनेक वर्षे जगभरातील टॅरो कार्डसचे अथक संशोधन करून ‘प्राचीन भारतीय टॅरो कार्ड्स’ पुनरुज्जीवित केले आहेत. ते ही याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत.)   

या पुस्तकात तुम्हाला काय मिळेल?

टॅरो कार्ड्स द्वारे प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर शोधून भविष्यवाणी कशी करतात.

चित्रातील प्रतिकांचा अर्थ आधुनिक जीवनशैली अनुसार कसा लावायचा.

ज्योतिषशास्त्र अन टॅरोट कार्ड यांचा नेमका सम्बंध साधून अचूक भविष्यवाणी कशी करतात याचे मार्गदर्शन.

टॅरोट कार्ड व ग्रहांचे साहाय्य घेऊन अडचणींवर हुशारीने मात कशी करावी याचे चिंतन.

स्वत:साठी किंवा दुस-यासाठी कार्ड रीडिंग कसे करावे?

विविध 'टॅरो स्प्रेड्स' कोणते आहेत?

घरबसल्या किंवा फोनवरून रीडिंग करण्याच्या प्रभावी पद्धती कोणती?

सूचना: हे पुस्तक स्वयंघोषित गुरूंसाठी नाही.  

हे पुस्तक ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही अशा नवशिक्या जिज्ञासूंसाठी सुरुवातीचे अभ्यास साधन आहे. विशेष म्हणजे, ज्ञानाचा हा खजिना तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे अतिशय माफक  किमतीत!

तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि भविष्यवाणी अचूक करण्यासाठी आजच हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे.

आत्ताच खरेदी करा!

Weight: 0.25 kg
Country of Origin: India
₹678.00