रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, पारलौकिक रेकी Reiki Grandmaster - Emporium
← Back to All Products

रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, पारलौकिक रेकी Reiki Grandmaster

Barcode (ISBN): 978-81-979094-4-3
₹779.00
✓ In Stock

पुस्तकाचे वर्णन

या दीर्घ ग्रंथामध्ये  रेकी ग्रँड मास्टर बनण्यासाठी संपूर्ण ज्ञान आहे!

परिपूर्ण रेकी ग्रँड मास्टर बनण्यासाठीची, कुंडलिनी शक्ती, चक्र हीलिंग , प्राणिक हीलिंग, अॅक्युप्रेशर, सुजोक, वास्तुशास्त्र, आध्यात्मिक स्वास्थ्य, इकिगाईचे प्राचीन तंत्र, लेगो थेरपी, आंतरिक शांती, होमिओपॅथी उपचार यासारख्या विषयांवर विस्तृत चर्चा या ४०० पानांच्या दीर्घ ग्रंथात आहे. हा ग्रंथ तुम्हाला "पारलौकिक रेकी" ची ओळख करून देतो.

रेकीचे मूळ आपल्या महाराष्ट्रात , हिंदुस्थानात आहे, जपानमध्ये नाही. हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्ध, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांना करुणा रेकीचे ज्ञान होते.

या ग्रंथात तुम्ही डॉ. मिकाऊ ऊसुई यांची, भारतातूनच रेकी शिकल्याची कहाणी वाचू शकाल.

आधुनिक रेकी शिकवणारे १,१०० हून अधिक पंथ आहेत. ज्यामध्ये फक्त व्यवसाय होतो. ‘पारलौकिक रेकी’ शुद्ध आहे, त्यात चिन्हे, क्रिस्टल, गंडा धागा दोरा, किंवा पिरॅमिड नसतात. ‘पारलौकिक रेकी’ आपले जीवन समृद्ध करते, रेकी फक्त आजारांसाठीच नाहीय.

या ग्रंथात आहेत भरपूर चित्रं. सोपी भाषा. समाज शास्त्रीय विश्लेषण.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले रेकी या विषयावरील हे जगातील एकमेव पुस्तक आहे, ज्यामध्ये रेकी आणि 'क्वांटम फिजिक्स' वर विस्तृत चर्चा आहे.

झोप, स्वप्नं, जल चिकित्सा, चुंबकीय शक्ती आणि दिशा इत्यादीचे भरपूर ज्ञान यात समाविष्ट आहे. रेकी कधी, कशी, कुठे द्यावी, कोणाला देऊ नये, खोलीतील प्रकाश व्यवस्था, फर्निचर इत्यादी सूक्ष्म गोष्टीही स्पष्ट केलेल्या आहेत. वैवाहिक जीवनाचा आनंद कसा घ्यावा, पाठदुखी आणि गुडघेदुखी कशी बरी करावी यावर गंभीर चर्चा आहे.

यात हीलिंग क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केलेला आहे. हा ग्रंथ प्राचीन भारतीय संस्कृती अन ‘सनातन हिंदू धर्म’ यांचे गुणगौरव करतो. या कारणामुळे विधर्मी लोकं याचा विरोधही करताना आढळतात. असो, ज्ञानी अन चिकित्सक उपचारकांस मात्र हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देतो.     

हा ग्रंथ म्हणजे हीलिंगच्या विश्वातील अत्यंत महत्वाचा   ‘दस्त-ऐवज’ आहे. तुमच्या संग्रही हा ग्रथ असायलाच पाहीजे.

अनुक्रमणिकेवर एक नजर,     

1.पारलौकिक रेकी म्हणजे काय?

2.पारलौकिक रेकीत केवळ अनुभूतिला महत्व का दिलं जातं?       

3.पारलौकिक रेकीत चिन्ह का नसतात?          

4. “क्रिस्टल रेकी” म्हणजे काय?      

5. रेकीचे किती पंथ आहेत?

 6. रेकी आणि प्लास्टिकचे पिरॅमिड यांचा काही सम्बंध आहे का?   

7.पारलौकिक रेकी  इतकी पॉवरफुल का आहे?

8. पारलौकिक रेकीत लेवल का नसतात?         

 9. कित्येकदा बातम्यांमध्ये सांगीतलं जातं की,  अतिरेक्यांनी कुठलें तरी ठिकाण किंवा इमारतीची रेकी  केली, मग अपराध केले.. यात सत्य काय आहे?   

10. साधारणत: शिकवली जाणारी लेवल I, लेवल ॥, लेवल III, मास्टर ग्रॅन्ड मास्टर, हे काय आहे?   

11.भारत देशात (टकाटा) रेकी पंथ कसा पोहचला? तो इतीहास वर्णन करा.

12.  ‘ऑरा स्कॅनिंग’ वर पारलौकिक रेकी चे काय भाष्य आहे?      

13.  रेकी किती काळ जागृत रहाते?   

14.आधुनिक विज्ञान आणि स्वयं घोषीत विज्ञानवादी, रेकीला विज्ञान असे का बरं मानत नाहीत? 

15.  स्वयं घोषीत विज्ञानवादी कोण आहेत?     

16.रेकीचा काही दुष्प्रभाव (साईड इफेक्ट) असतात का?

17. हीलर मध्ये कुणा रोग्याचा आजार येऊ शकतो का? हो, तर यावर उपाय काय?     

18. करुणा रेकी वर पारलौकिक रेकीचे काय भाष्य आहे?

19.  पारलौकिक रेकी मृत्यूला टाळू शकते का?  

20.अन्य थेरपीमुळे रुग्ण बरा झाला, किंवा त्याला निसर्गत: बरे वाटू लागले तर रेकीचे महत्व काय?   

 21.  ‘रेकी’  ची शक्ती डा. मिकाऊ ऊसुई यांना कशी प्राप्त झाली? 

22.  रेकी चा सगळ्यात मोठा चमत्कार,  संत ज्ञानेश्वर माऊली:       

23. रेकी चा वैज्ञानिक दृष्टिकोन व ‘क्वांटम फिजिक्स’, या बाबतचे तांत्रिक भाष्य स्पष्ट करा?           

24.रेकी रोगांवर कसे काम करते?     

 25. जुनाट आजार, रेकी ने बरे होतात का?     

26.  रेकी अनुसार, रेकी ऊर्जेचे वहन या सम्बंधीचे भाष्य स्पष्ट करा  

27. रेकी चे ‘स्पिरिच्युअल हीलिंग' सम्बंधी कोणते भाष्य आहे?     

28.  रेकी अन दिशा           

29.   रेकी’चे  झोप घेण्या सम्बंधी कोणते नियम आहेत? त्याची सविस्तर चर्चा करा.     

30. रेकी अनुसार, बेडशी सम्बंधित नकारात्मक ऊर्जा काय असते?

 31. रेकी, चुम्बकीय शक्ती, आणि दिशा, कसे काम करतात ?      

32.  रेकी हीलर्स साठी झोपेचे कोणते नियम आहेत        

33. रेकी स्वप्नशास्त्राचं कसं विश्लेषण करते      

34. रेकीत पाणी पिणे अन भोजन करणे या सम्बंधी कोणते नियम आहेत?   

35. रेकी हीलरसाठी शाकाहारी- मांसाहारी भोजनावर काय भाष्य आहे?      

36.रेकीचे स्थान शुद्धि बद्दलचे काय नियम आहेत?         

37.  रेकी कक्षातील, ‘द्रव्य शुद्धिचे’ (फर्नीचर) कोणते नियम आहेत?          

38.  रेकी कक्षातील, रंग अन उजेडाच्या बद्दल काय नियम आहेत? 

39. रेकी कक्षातील, दिशा, या विषयी कोणते नियम आहेत?         

40.  रेकी कक्षातील, आवाज, या विषयी कोणते नियम आहेत?     

 41.  रेकी कोणत्या मुहुर्तावर द्यावी, त्याचे कोणते नियम आहेत?    

42. रेकी देताना ‘तन शुद्धि’ बाबत कोणता नियम आहे?  

 43. रेकी अनुसार, मन शुद्धि, चे काय नियम आहेत?      

 44. रेकी अनुसार, सामाजिक स्वास्थ्य, बद्दल काय नियम आहेत?  

45.रेकी शक्तिपात करण्या बाबतचा नियम काय आहे?  

 46.  सेल्फ़  रेकी घेण्याबाबत कोणते नियम आहेत?       

47.  दुस-यांना  रेकी ट्रीटमेंट देण्याच्या प्रक्रियेचे नियम कोणते आहेत?        

48.  कुणाला रेकी देऊ नये याबद्दल काय नियम आहेत?  कोणत्या प्रकारच्या लोकां पासून सावध रहावे?

 49. वास्तु ला  रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?         

50.  पाण्याला  रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?        

51. रेकी चे चिन्हांबाबत काय नियम आहेत?    

52.  दुस-यांना रेकी देता देता आपली ऊर्जा कमी होते का?   रेकीचे यावर काय भाष्य आहे?           

53. रेकी चोरली जाऊ शकते?  रेकीचे यावर काय भाष्य आहे?   

54. रेकी द्वारा पैसे कसे कमावतात?रेकी चे, यावर काय भाष्य आहे?           

55.  रेकीद्वारा, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे नियम सांगा. क्र हीलिंग बाबत कोणते भाष्य आहे?   

 56. रेकीचे, ‘चक्र’ या विषयावर काय भाष्य आहे?        

57. चक्रं नेमकी कुठे असतात या विषयावर  रेकीचे काय भाष्य आहे?         

58. कुंडलिनी शक्ती जागृत का करावी?          

59. जेंव्हा चक्र सक्रिय होतात तेव्हा काय घडते ?  रेकीचे यावर काय भाष्य आहे?       

60.  रेकी अनुसार चक्र हीलिंग, चे नियम काय आहेत?   

61. चक्र, अन आपल्या शरीरातील ग्रंथी, यांचा संबंध  रेकीत कसा दर्शवलेला आहे?    

 62. रेकी अनुसार चक्र सक्रिय करण्याची प्रक्रिया काय आहे?       

63. एक प्रश्न आहे, हे रंग काय आहेत? मला कोणतेच रंग दिसले नाहीत. काही गडबड आहे का?      

64.प्राचीन ज्ञानी पुरुषांच्या मंतव्यानुसार, कोणकोणते रंग दिसतात?

65. गुरूजी, हे बीजाक्षर, किंवा मंत्र, काय असतात? त्याचे काय नियम आहेत?          

66. रेकीचे, चक्रांचे सविस्तर विवरण अन नियम कोणते आहेत?    

67.कुंडलिनी शक्ती ला ‘सर्पेनटाईन’ पावर का म्हणतात?  रेकीचे यावर काय भाष्य आहे?           

68. कुण्डलीनी जागृत झाल्यास कोण कोणत्या गती प्राप्त होतात?  रेकीचे यावर काय भाष्य आहे?   

69. पिपिलिका गति,भुजंग गति,मंडुक गति,विहंग गति

70. रूढ़िवादी लोकांस,  रेकीकुंडलिनी शक्तिच्या, स्पर्श विधि वर, आक्षेप का आहे?  कोणते भाष्य आहे?

71. रेकीचे एक्युप्रेशर सम्बंधित कोणते नियम आहेत?    

72. रेकीत, सुजोक थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी यांच्याशी  सम्बंधित, कोणते नियम आहेत? 

 73. रेकी, अन प्राणिक हीलिंग च्या वापराबद्द्ल, गुरूंचा आदेश काय आहे?  

74.प्रत्यक्ष प्राणिक हीलिंगचे, तेरा नियम, आणि गुरूचा आदेश,  काय आहे?          

75. प्राणिक हीलिंगचा प्रसार, रेकी इतका झाला नाही त्याचे काय कारण असावे?        

76. स्वयं प्राणिक हीलिंग कसे करावे?

77. रेकी, लेगो थेरपी, इकिगाई , यांच्या रहस्यांवर, गुरूंचे मार्गदर्शन काय आहे? त्यांचे नियम स्पष्ट करावेत.

 78. रेकी, द्वारा, मुलांना मोबाईल पासून कसे मुक्त केले जाते? कृपया त्याचे नियम स्पष्ट करावेत.

79. रेकीतील, (ध्यान सूचना) ‘गाईडेड मेडिटेशन’ चे नियम काय आहेत?

 80.  रेकी - होमिओपॅथी आणि काही घरगुती उपचार

Weight: 0.25 kg
Country of Origin: India
₹779.00